सामाजिक कल्याण एंव मानव संरक्षण संघाचे कार्य कौतुकास्पद.

अकलूज (प्रतिनिधी)सामाजिक कल्याण एंव मानव संरक्षण संघ, पश्चिम भारत अध्यक्ष. अमोल बाळासाहेब माने यांच्याकडे पाच तारखेला सुखदेव जगताप नावाचे वयोवृद्ध आजोबा आणि आज्जी येऊन भेटले आणि आजोबांनी सांगितले पडल्यामुळे दोन महिने झाले हात मोडला आहे, पण पैसे नसल्याने दवाखान्यात गेलो नाही आम्ही नवरा बायको विजय चौक येथे नारळ विकून पोटपाणी भागवतोय एक मुलगा परगावी असतो तर घरात दुसरा मुलगा आहे तो जरा मतीमंद आहे, सरकारी दवाखान्यात गेलो तर ते म्हणाले सोलापूरला सिव्हिला जावा,पण आम्हाला जाता येणार नाही, मी हात दुखतोय म्हणून रूपाया दोन रूपायांच्या गोळ्या खातोय,
एकाने तुमचे नाव सांगितले अमोल माने ह्याना जाऊन भेटा तुम्हाला मदत करतील, हे ऐकून अमोल माने यांनी लगेच पुन्हा सरकारी दवाखान्यात आजोबांना घेऊन गेले आणि एक्सरे काढून घेतल्यानंतर समजले हाड तुटले आहे, पुढे दोनतीन खाजगी दवाखान्यात उपचारासाठी चौकशी केली पण उपयोग झाला नाही,
नंतर डॉ रावसाहेब गुळवे यांना भेटून अमोल माने यांनी हा सगळा प्रकार सांगितला आणि म्हणले आमच्या मानव संरक्षण संघाच्या वतीने मी योजनेच्या कागदपत्रांचा पाठपुरावा करतो पण यांना माणूसकीच्या नात्याने आपण मदत करू, डॉ. रावसाहेब गुळवे म्हणले माझ्याकडून चांगले सहकार्य राहील व पेशंटची काळजी चांगल्याप्रकारे घेऊ, आणि आज मोठ्या खर्चाचे ऑपरेशन योजनेतून झाले आणि डॉक्टरांनी तशी काळजी घेतल्यामुळे आज सामाजिक कल्याण एंव मानव संरक्षण संघ, पश्चिम भारत अध्यक्ष. अमोल माने यांच्या वतीने डॉ. रावसाहेब गुळवे यांचे पुष्पबुके देऊन अभिनंदन करण्यात आले.